योहान १०:२७
*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!* *प्रभात तारा* *✨ख्रिस्ताची मेंढरे✨* *माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात..✍* *( योहान १०:२७ )* *...मनन...* *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा येथे मेंढपाळाचे प्रतीक घेऊन यहूद्यांना आठवण करून दिली आहे की, ते जर त्याची खरी मेंढरे असती तर त्यांनी त्याची वाणी ऐकली असती. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर चालायल...