Posts

Showing posts from September, 2019

योहान १०:२७

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                 *प्रभात तारा*             *✨ख्रिस्ताची मेंढरे✨* *माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात..✍*                *( योहान १०:२७ )*                           *...मनन...*            *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*        प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा येथे मेंढपाळाचे प्रतीक घेऊन यहूद्यांना आठवण करून दिली आहे की, ते जर त्याची खरी मेंढरे असती तर त्यांनी त्याची वाणी ऐकली असती. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर चालायला लागण्याची आवश्यकता आहे. कारण केवळ आमचा त्याच्यावर विश्वास आहे असे म्हणून नव्हे तर विश्वासाबरोबरच आम्ही कृती करणेही गरजेचे आहे, कारण कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे. प्रभूबरोबर चालत असताना त्याच्यासोबत जुळलेल्या नात्यात आम्ही वाढत राहिले पाहिजे.         उत्तम मेंढपाळ म्हणजेच उत्तम मार्गदर्शक होय. प्रभू आम्हाला म्हणजेच त्याच्यासोबत चालणाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतो, व आमची काळजी घेतो, आमच्यावर लक्ष ठे

प्रेषित २:१७

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                *🌟प्रभात तारा🌟*       *✨सर्वश्रेष्ठ दान - पवित्र आत्मा✨* *मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील..✍*                    *( प्रेषित २:१७ )*                            *...मनन...*           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*        परमेश्वराने आमच्यासाठी पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करून देणे ही एक अभूतपूर्व योजना आखली आहे. देवाने मानवांसाठी पवित्र आत्म्याच्या योगे तारणाची एक मोठी आशा प्राप्त करून दिलेली आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण अनेक अशक्य गोष्टी प्राप्त करू शकतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण आशीर्वादित होऊ शकतो. पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, आमच्या संगती राहतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होऊ शकतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही इतरांच्याही आशीर्वादाचे कारण बनू शकतो.        त्यासाठी पवित्र आत्मा मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? वचनाद्वारे पाहू या..     *१) पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या -* पश्चाताप करणे म

इब्री १२:१४

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                 *🌟प्रभात तारा🌟*   *✨पवित्रीकरण मिळविण्याचा प्रयत्न करा✨* *सर्वांबरोबर 'शांततेने राहण्याचा' व ज्यावांचून प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा 'झटून प्रयत्न करा'..✍*                    *( इब्री १२:१४ )*                           *...मनन...*          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*            आपण दोन गोष्टींच्या मागे लागले पाहिजे, सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर चांगले व शांतीचे संबंध ठेवले पाहिजेत आणि देवाच्या दृष्टीत देवासमोर पवित्र असे आचरण ठेवले पाहिजे. आपण या दोन गोष्टींकरिता झटले पाहिजे.   विश्वासणाऱ्याचे वर्तन सुधारण्याकरिता व त्याला शिस्त लागावी म्हणून देव त्यालाही शिक्षा करीत असतो. शिक्षा फक्त पापी लोकांसाठीच नाही तर विश्वासणाऱ्यांसाठी देखील आहे. *तो करितो ती शिक्षा आपल्या हितासाठी, कारण आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करितो. ( इब्री १२:१०)* ह्यासाठी की,  जगाच्याबरोबर आपल्याला दंड होऊ नये म्हणून देव स्वतःच आम्हाला शिक्षा करीत आहे. प्रेषित

लूक १०:४२

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                  *🌟प्रभात तारा🌟*          *✨चांगला वाटा निवडा✨* *परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे, मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही..✍*                    *( लूक १०:४२ )*                           *...मनन...*            *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*            मार्था व मरीया या ज्या लाजरला येशूने मरणातून उठविले होते त्याच्या या दोन बहीणी होत्या. प्रभू येशू त्यांच्या घरी आला असता मार्था आदरातिथ्य करण्यात गुंतली आणि मरीया तिला मदत करीत नाही म्हणून ती तिला दोष देत होती. तिची कुरकुर ऐकून प्रभू तिला वरील वचनाद्वारे बोलत आहे. मरीया तर प्रभूच्या चरणांपाशी बसून प्रभूचे भाषण ऐकत बसली होती. कारण मरीयेला आत्मिक भूक लागली होती. ती प्रभूचे ऐकण्यास व त्याची महानता ओळखण्यास उत्सुक होती. तिने आपली आत्मिक गरज ओळखून चांगला वाटा निवडून घेतला होता. तो तिच्यापासून कुणीच काढून घेऊ शकणार नव्हते. येशूसाठी भरपूर पक्वान्ने करण्याऐवजी येशूचे भाषण ऐकण

फिलिप्पै २:९,१०

Image
*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                  * प्रभात तारा *               * विजयाची रहस्ये * *ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नांवांपेक्षा जे श्रेष्ठ नांव ते त्याला दिले, ह्यांत हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जावा..✍*            *( फिलिप्पै २:९,१० )*                            *...मनन...*              *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*          प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हे त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे सन्मानाचे स्थान व अधिकार यांचे दर्शक आहे. प्रत्येकाने ख्रिस्ताची श्रेष्ठता ओळखून त्याच्यापूढे गूडघे टेकावेत ही देवाची योजना आहे. कारण ख्रिस्ताने मरणावर  खूप मोठा विजय मिळविला आहे. मृत्युची सर्व बंधने तोडून टाकून, मरणाची नांगी मोडून टाकून मृत्युवर विजय मिळविला आहे. आज आम्ही जे विश्वासणारे, ख्रिस्ताला अनुसरणारे आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वादळवाऱ्यात, तुफानात दृढ, भक्कम, खंबीर असे टिकून राहण्यासाठी, विश्वासात अढळ राहण्यासाठी

२ रे करिंथ १२:९

Image
*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*                   * प्रभात तारा *              * देवाची महान कृपा * *परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे..✍*             *( २ रे करिंथ १२:९ )*                           *...मनन...*            *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*           ख्रिस्त आम्हाला सदोदित आनंद, समाधान देतो. असामान्य कार्यासाठी आम्हाला असामान्य सामर्थ्य पुरवितो. म्हणजेच ख्रिस्त ज्या अंतःकरणात वसती करतो तेथे सामर्थ्य, धैर्य, आनंद व समाधान यांचीही वसती असते. प्रियांनो, अनुभवाने आपल्याला ठाऊक आहे की, देवाच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पवित्र शास्रात आपण अनेक ठिकाणी वाचतो, "कृपेची भरपूरी", कृपेची विपुलता, महान कृपा, नवीन कृपा, इत्यादि. देवाची कृपा म्हणजे आम्ही अपात्र असताना आमच्यावर झालेली मेहेरबानी. त्याचे नीतिमत्व तो मला देतो. हीच त्याची अद्भूत कृपा आहे. पुरे म्हणजे, पुरून उरणारी. म्हणजे ओसंडून वाहणारी. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो, *माझे पात्र काठोकाठ भरून वाहत